आतुर मी तिला भेटण्यासाठी, ती होती आतुर तशीच,
मी होतो नेहमीच तिचा, आज तीही झाली माझीच.
बघणं आमचं व्हायचं रोज, बोलणं मात्र कधीच नाही
वाट बघत थांबायचो मी, तीला फक्त जाण्याची घाई.
माझ्या भावना तिला समजल्या ? फक्त हे देवालाच माहित.
तिच्या मनात नेमकं काय? भाव कधी समजलेच नाहीत.
नजरा-नजर झाली अनेकदा , ती तर रोजच व्हायची,
वाट बघत पुन्हा थांबायचो , ती तशीच निघून जायची.
आज मात्र भिडली नजर , समोरच तिच्या झालो स्तब्ध,
योगायोग अन नशीब माझे? सुचलेच नाहीत काही शब्द.
पाहून मला क्षणभर थांबली, पुन्हा गेली तिच्या वाटेवर,
मागे वळून तिने बघितलं, स्वार झालो मी लाटेवर.
इतके दिवस झुरत राहिलो, पाहून वाट ती येण्याची,
मी होतोच तीचा नेहमी, अन ती माझी होण्याची.
बघताच मागे तिने मला, चेहऱ्यावर नवं लकेर उमटली
नकळत तिची झुकली नजर, अन गालावरची खळी चमकली.
चमकणारी खळी गेली सांगून, गुपित काय तिच्या मनातलं,
तीही आज झाली माझी , नव्हतं प्रेम हे क्षणातलं.
दोघांचेही मन आज जुळले , जणू चंद्र चांदणं नभातलं
तीही आज झाली माझी , नव्हतं प्रेम हे क्षणातलं.
तीही आज झाली माझी , नव्हतं प्रेम हे क्षणातलं...
टिप--
वरील ओळी स्वतःबद्दल आहेत अशा वाटू शकतात, याचा कोण्या व्यक्तीशी अथवा घटनेशी संबंध नाही तसे झाल्यास अगर वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा 😂😂😂.
Like, Comment, Share करण्यास हरकत नाही.