Showing posts with label प्रेम. Show all posts
Showing posts with label प्रेम. Show all posts

Saturday, August 4, 2018

सोबत...

सोबत...

सोबतीला माझ्या आहेस तू नेहमी
अशीच सोबत देशील का ?
कधीतरी चिडलो चुकून ओरडलो 
तरी मला समजून घेशील ना ?

राग व्यक्त होतो तुझ्यावर 
प्रेम हि व्यक्त करतोच कि
तू हि चिडतेस रुसतेस माझ्यावर
तेंव्हा मीही तुझ्यामागे झुरतोच कि

लाडाने बोलतेस हक्काने सांगतेस
अशीच बोलत राहशील ना ?
रुसवा काढायची अन तुला हासवायची
संधी मलाच देशील ना ?

येतील नवं नवीन नाती पुढे,
हे नातं अतूटच ठेवशील ना ?
सुखीच राहा नेहमी तू,
माझं हि सुख वाटून घेशील ना ?
माझं हि सुख वाटून घेशील ना ?


vj

प्रेम हे असं भावनिक मिश्रण आहे की ते कधीच विसरलं जाऊ शकत नाही. 👍

काही तरी बोल ना

 काही तरी बोल ना दिवसेंदिवस तुझा हा दुरावा कधी येऊन संपावशील? प्रेमाचे चार शब्द एकवूनी पुन्हा मला आपलंसं करशील तयारच आहेत कान माझे मन ही आतु...