Tuesday, March 31, 2020

दिलासादायक: ओझोनचे छिद्र भरण्यास सुरुवात

 'मॉन्ट्रियल कराराचा इफेक्ट'
           अंटार्क्टिका वरील ओझोन छिद्र नैसर्गिकरित्या भरून येत आहे, त्यामुळे दक्षिण गोलार्धातील वातावरणात होणारे अनेक चिंताजनक बदल प्रत्यक्षात थांबण्यास मदत होईल. कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण असले तरी ही एक दिलासा दायक अशीच बातमी आहे. 
            गेल्या काही दशकात मानवी कृत्यांमुळे ओझोन चे संतुलन बिघडत चालले होते, १९८७ चा माँट्रियल करार व १९८९ च्या लंडन परिषदेमुळे ओझोन अवक्षयाचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले आहे. अनेक राष्ट्रांबरोबरच भारत ओझोन समस्येबाबत जागृत व जबाबदार राष्ट्र आहे. 

            स्थितांबरात असणार्‍या ओझोनामुळे सूर्याकडून येणार्‍या अतिनील किरणांचा काही भाग शोषला जातो आणि सजीवांना पोषक एवढीच उष्णता भूपृष्ठावर येते. त्यामुळे अतिनील किरणांपासून सजीव सृष्टीचे संरक्षण होते. अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग, डोळ्यांचे विकार इ. अनेक विकार जडतात. स्थितांबरातील या ओझोनाच्या रूपाने पृथ्वीभोवती एक सुरक्षा कवच निर्माण झाले आहे.
            तसेच नासाने दिलेल्या माहितीनुसार एकट्या चीन मधील कॉर्बन मोनोक्सीड चे प्रमाण मागील वर्षापेक्षा ३० ते ४०% नी कमी आलं आहे.

Image Source: ladbible.com
ओझोन म्हणजे काय ?

- ओझोन हा ऑक्सिजनचाच एक प्रकार आहे, त्याचे रासायनिक सूत्र O3 आहे. सजीवांना श्वसनासाठी  लागणार ऑक्सिजन म्हणजे O2.
- ओझोन हा आपल्या वातावरणाचा एक भाग आहे, त्याचे अस्तित्व मानवी आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. 
- बहुतेक ओझोन वातावरणामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 ते 40 कि.मी. पर्यंत उंचीवर असतो. या प्रदेशास स्तिथांबर म्हणतात.

ओझोन संबंधी अंतरराष्ट्रीय करार:- 

- Vienna Convention for the Protection of the Ozone Layer: २२ मार्च १९८५

- The Montreal Protocol on Substances that Deplete the Ozone Layer: १६ सप्टेंबर १९८७

- १५ ऑक्टोबर २०१६ रोजी किगाली (रवांडा) येथे भरलेल्या परीषदेत Montreal Protocol मध्ये दुरूस्ती करण्यात आली.

Monday, March 30, 2020

३० मार्च, राष्ट्रीय डॉक्टर्स डे Doctors Day

३० मार्च, राष्ट्रीय डॉक्टर्स डे

आज ३० मार्च, जागतिक डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टर्स ना खूप शुभेच्छा.
समाजातील एक असा घटक ज्याची गरज आज खाऱ्या अर्थाने संपूर्ण जगाला पटली आहे. डॉक्टर म्हणजे देव असं आपण आधी मानतो. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत विविध ठिकाणी आपला आणि डॉक्टर्स यांचा संबंध येत असतोच.

माणूस खुश असेल तर त्याला दगडात सुद्धा देव दिसतो आणि तोच जर दुःखी झाला तर देवालाच नावं ठेवतो, अगदी तसच काही डॉक्टरांच्या बाबतीत देखील घडतं. पेशंट ठणठणीत झाला तर डॉक्टर म्हणजे परमेश्वर आणि चुकून दगावला तर हेच डॉक्टर पेशंटच्या नातेवाईकांसाठी राक्षस किंवा पैसे खाणार देखील होऊन जातो. प्रसंगी डॉक्टर्स,नर्स, स्टाफ यांच्यावर हात देखील उगारला जातो. गरज आहे ती दृष्टीकोण बदलण्याची.

इमेज सौर्स  www.oneindia.com

खेडोपाड्यात आजही कितीतरी माणसं वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावतात, कितीतरी स्रियांची प्रसूती योग्य प्रकारे होत नाही, कितीतरी लहानं मुले जन्मतः अपंगत्व घेऊन जन्माला येतात. याला डॉक्टर जबाबदार नाहीत, अपुऱ्या सोई सुविधा, औषधे आणि लोकांमध्ये न झालेली जनजागृती जबाबदार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रूपाने खेडोपाड्यात दवाखाना , डॉक्टर्स पोहचले पण त्यांना हव्या त्या सुविधांचा अजूनही अभाव आहे. घरापासून लांब, स्वतःच्या परिवारापासून लांब राहून डॉक्टर्स सुविधा पुरवत आहेत.

भारत आज विकसनशील देशांमध्ये देखील पुढं आहे. पण तरीही आरोग्याविषयक असणारं बजेट हे कमीच आहे. आज जगाला नोवेल कोरोना व्हायरस ने भंडावून सोडलं आहे. त्यामुळेच भारतातील आरोग्यसेवेचा प्रश्न पुन्हा वर आला आहे. भारत भविष्यात आरोग्यसेवेमध्ये देखील अग्रेसर होईल अशी आशा आहे.


विजय बाबासाहेब गुरव
३० मार्च,२०२०
कोल्हापूर

काही तरी बोल ना

 काही तरी बोल ना दिवसेंदिवस तुझा हा दुरावा कधी येऊन संपावशील? प्रेमाचे चार शब्द एकवूनी पुन्हा मला आपलंसं करशील तयारच आहेत कान माझे मन ही आतु...