Sunday, August 19, 2018

अटल बिहारी वाजपेयीजीं को भावपूर्ण श्रद्धांजली



अटल आपकी कविताएं ,
यही आपकी भाषा थी।
अटल आपकी सोच में
देशभक्ति की अभिलाषा थी।


अटल आपके विचार से,
प्रेरित सारा संसार था।
विचारोंकी लढाई थी,
पर मन मे आपके प्यार था।


अटल आपके शरीर ने
बस छोड़ा जग का मैदान हैं।
आपकी सोच विचार ही,
आज हमारे लिए वरदान हैं।

आपकी सोच- विचार ही,
आज हमारे लिए वरदान हैं।...vj


भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजीं को भावपूर्ण श्रद्धांजली

Saturday, August 18, 2018

फिर से उभर तू आज में



*  फिर से उभर तू आज में  *


तेरी आज की हंसी 
दबी हैं कल के शोर में
जो हुआ उसे भी लेकर साथ
फिर से उभर तू आज मे।

जाने कितने ठोकर 
और जिंदगी ले आएगी
खुद को रख संभल कर 
तेरी हिम्मत ही काम आएगी।

बचा बचाया सिमट के
कर हौसला तू बुलंद आज
ये वक्त भी बदल जायेगा कल
खुद पर तुझे होगा नाज़।

तेरे कर्म क्या अच्छे बुरे 
होगा हिसाब बाद में
जो हुआ उसे भी लेकर साथ
फिर से उभर तू आज मे।
जो हुआ उसे भी लेकर साथ
फिर से उभर तू आज मे। ...vj





जिंदगी की जंग में बहुत से पल हताश कर जाते हैं, लेकिन उसमें से भी उड़ान भरने की जिद दिल में होनी चाहिये.. हमे हर ऐसी स्थिति में खुद के भीतर जरूर झांक कर देखना चाहिए शायद रास्ता दिखे, लेकिन एक उम्मीद की किरण जरूर मिल जायेगी।

Saturday, August 4, 2018

सोबत...

सोबत...

सोबतीला माझ्या आहेस तू नेहमी
अशीच सोबत देशील का ?
कधीतरी चिडलो चुकून ओरडलो 
तरी मला समजून घेशील ना ?

राग व्यक्त होतो तुझ्यावर 
प्रेम हि व्यक्त करतोच कि
तू हि चिडतेस रुसतेस माझ्यावर
तेंव्हा मीही तुझ्यामागे झुरतोच कि

लाडाने बोलतेस हक्काने सांगतेस
अशीच बोलत राहशील ना ?
रुसवा काढायची अन तुला हासवायची
संधी मलाच देशील ना ?

येतील नवं नवीन नाती पुढे,
हे नातं अतूटच ठेवशील ना ?
सुखीच राहा नेहमी तू,
माझं हि सुख वाटून घेशील ना ?
माझं हि सुख वाटून घेशील ना ?


vj

प्रेम हे असं भावनिक मिश्रण आहे की ते कधीच विसरलं जाऊ शकत नाही. 👍

Saturday, March 17, 2018

नव्हतं प्रेम हे क्षणातलं...

आतुर मी तिला भेटण्यासाठी, ती होती आतुर तशीच,
मी होतो नेहमीच तिचा, आज तीही झाली माझीच.
बघणं आमचं व्हायचं रोज, बोलणं मात्र कधीच नाही
वाट बघत थांबायचो मी, तीला फक्त जाण्याची घाई.

माझ्या भावना तिला समजल्या ? फक्त हे देवालाच माहित.
तिच्या मनात नेमकं काय? भाव कधी समजलेच नाहीत.
नजरा-नजर झाली अनेकदा , ती तर रोजच व्हायची,
वाट बघत पुन्हा थांबायचो , ती तशीच निघून जायची.

आज मात्र भिडली नजर , समोरच तिच्या झालो स्तब्ध,
योगायोग अन नशीब माझे? सुचलेच नाहीत काही शब्द.
पाहून मला क्षणभर थांबली, पुन्हा गेली तिच्या वाटेवर,
मागे वळून तिने बघितलं, स्वार झालो मी लाटेवर.

इतके दिवस झुरत राहिलो, पाहून वाट ती येण्याची,
मी होतोच तीचा नेहमी, अन ती माझी होण्याची.
बघताच मागे तिने मला, चेहऱ्यावर नवं लकेर उमटली
नकळत तिची झुकली नजर, अन गालावरची खळी चमकली.

चमकणारी खळी गेली सांगून, गुपित काय तिच्या मनातलं,
तीही आज झाली माझी , नव्हतं प्रेम हे क्षणातलं.
दोघांचेही मन आज जुळले , जणू चंद्र चांदणं नभातलं
तीही आज झाली माझी , नव्हतं प्रेम हे क्षणातलं.
तीही आज झाली माझी , नव्हतं प्रेम हे क्षणातलं...



टिप--
वरील ओळी स्वतःबद्दल आहेत अशा वाटू शकतात, याचा कोण्या व्यक्तीशी अथवा घटनेशी संबंध नाही तसे झाल्यास अगर वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा 😂😂😂.
Like, Comment, Share करण्यास हरकत नाही.

Tuesday, September 12, 2017

तू अशी अबोल


दोघांचं बोलणं म्हणजे दंगा मस्ती
खुप काही चेष्टा आणि नखरेच जास्ती
बोलशील हसत आणि करशील शांत
मला गप्प बसवणे हा तुझाच प्रांत


संपत नसत बोलण आपलं
तरीही ठेवावा लागतो फोन
बोलणं एकेकदा होतही नाही
नेमकं गायब असतं कोण?


किती बालिश पण सच्च्या गोष्टी
एकमेकांना आपण असतो सांगत
अनेकदा तर लहान असूनही आपण
समजूतदारपणे असतो वागत


आज तू वाटलीस जरा शांत
हरवली होतीस स्वतःच्या मनात
तरीही आपलं बोलणं झालं
शांत का हे लक्षात नाही आलं


कशी रे तू अशी वेगळी मस्त,पण
स्वतःला ठेवतेस विचारांत व्यस्त
अशी एकटी अबोल नको बसू फक्त
आहेस तशीच आवडतेस सर्वांना जास्त



Vj
10 सप्टेंबर 2017
पुणे

Friday, July 14, 2017

भेट तुझी

आज ते पुन्हा भेटले...,

त्याच बोलणं ती ऐकत होती
स्वतःला ती सावरत होती
मनात चिंता खूप विचार
पण सांगायला ती घाबरत होती

त्याने ओळखलं मनातलं
जवळ गेला आणि थोडस हसला
तिची समजूत काढत जवळच बसला
आहे मी सोबत नेहमी तुझ्या
तिला धीर देत थोडस हसला

नको रडू रे आठवणीत तू
काय केलाय गुन्हा सांग तू?
माझ्यासाठीतरी पूस हे डोळे
नकोत मला ते किंचितही ओले

क्षणात तिने मान हलवली
डोळे पुसत पाहू लागली
'नाही मी रडत कधीच' म्हणत
मानाचा मोठेपणा दाखवू लागली.

तोही हसला आणि तीही हसली
डोळ्यात तिच्या एक लकेर चमकली
त्याने हात पसरताच ती
जवळ येऊन त्याला बिलगली.

- Vj

काही तरी बोल ना

 काही तरी बोल ना दिवसेंदिवस तुझा हा दुरावा कधी येऊन संपावशील? प्रेमाचे चार शब्द एकवूनी पुन्हा मला आपलंसं करशील तयारच आहेत कान माझे मन ही आतु...