अशी कशी मुखरलीस तू,
मी नसलेला बघून जवळ
मनसोक्त कशी बरसलीस तू?
Image source: google.in |
नव्हतो आपण सोबत तरी
घेऊन गारांना आलीस तू,
तुषार थेंबांना साद घालूनी
सांग का बरसलीस तू ?
रोज होतील हेवे दावे
होईल तू-तू मै-मै रोज,
ते सारे करून बाजूला
आनंदाचे क्षण तू मोज।
रोजच भांडण होतं आपलं
बघून आज तापली हि माती,
साथ देशील आयुष्यभर म्हणत
कशी विसरलीस आपली नाती?
विचार तुझ्या आसवांना
सांग जरा रागावून तू,
मी नसलेला बघून जवळ
मनसोक्त कशी बरसलीस तू?।
मी नसलेला बघून जवळ
मनसोक्त कशी बरसलीस तू?...Vj
:- स्व,
कात्रज घाट,
पुणे.
२०१८
No comments:
Post a Comment