Monday, March 8, 2021

काही तरी बोल ना

 काही तरी बोल ना



दिवसेंदिवस तुझा हा दुरावा

कधी येऊन संपावशील?

प्रेमाचे चार शब्द एकवूनी

पुन्हा मला आपलंसं करशील



तयारच आहेत कान माझे

मन ही आतुर झालंय

हरवून जाऊदे स्वतःला आता

पाणी ही दाटून आलंय


रडवा चेहरा नाही रे हा

आनंदाचे इशारे आहेत

बोलणार तू पुन्हा म्हणून

दुःखांवर ताशेरे आहेत


शब्दांच्या तारेवर झुलव मला 

मधुर वाणी ऐकव ना

दुरावा संपवून ये पुन्हा अन

काही तरी बोल ना

काही तरी बोल ना...Vj


:- स्व

कोल्हापूर,

०२/०३/२०२१

Sunday, February 21, 2021

नको भेद

 भेद नको मुलामुलींत

खूप वेळा ऐकलंय

जाणते अजाणतेपणी

भेद होताना पाहिलंय



 मुलगी म्हणून हे ते नको

मुलगा असेल काहीही चालतं

नावालाच हो सारं काही 

परंपरा म्हणत पांघरून घालतं


 शिक्षण आपण देतो मुलींना

पण काम करू देतो का?

मुलींना नाही जमणार म्हणत

मागे आपणच ओढतो का?


आवड निवड तर लांबच राहूदे

निर्णयात देखील आपली मत्तेदारी

तिला काय कळतंय लग्नातल

नवरा निवडण आपली जिम्मेदारी


त्यांनाही आहे विश्व स्वतःच

नवं उभारी त्याही घेतील

उज्वल भवितव्य घेऊन हाती

अभिमानाने मग नाव कमावतील... Vj


:- स्व

कोल्हापूर

३१/०७/२०२०

Thursday, January 14, 2021

नजरेत तुझ्या राहूदे

 नजरेत तुझ्या राहूदे


तुझं असणं दिसणं बोलणं चालणं

 सारं सारं पाहू दे

आयुष्यभरासाठी मला तू 

नजरेत तुझ्या राहूदे



तुझं हसणं लाजणं लाजून पाहणं

पुन्हा पुन्हा होऊन जाऊदे

आयुष्यभरासाठी मला तू 

नजरेत तुझ्या राहूदे


तुझं चिडणं रुसणं रुसून बसणं

मला तुला मनवु तर दे

आयुष्यभरासाठी मला तू 

नजरेत तुझ्या राहूदे


तुझं क्षणाच भेटणं भेटून बिलगणं

एकमेकांत हरवून जाऊदे

आयुष्यभरासाठी मला तू 

नजरेत तुझ्या राहूदे...Vj


:- स्व

कोल्हापूर

१४ जानेवारी, २०२०

Thursday, June 11, 2020

बिता बचपन

बड़ी मासूम सी थी जिंदगी
सबकुछ नया नया सा था।
वक्त वक्त की बात हैं,
बड़ा हसीन बचपन था।

गिरते संभलते रहते हर दिन
मस्तीसे भरा आंगन था।
गलतियां और शरारतसे भरा,
बड़ा हसीन बचपन था।

गलियारों से भटकते हुए
मजेमें दिन गुजर जाता।
माँ बाप की प्यारी डांट मेभी,
बड़ा हसीन बचपन था।

झगड़े आपस में सुलझा लेते
यारी में प्यार बहोत था।
जीना फिरसे हैं वो जिंदगी,
बड़ा हसीन बचपन था ।...Vj


:- स्व,
11 जून, 2020,
कोल्हापूर

Thursday, May 14, 2020

शिवपुत्र शंभू


छ्त्रपती श्री संभाजी महाराज

गडगडाट मेघांचा करीत आसमंत भरून आले
हिंदवी स्वराज्य रक्षिण्या शिवपुत्र शंभू झाले..

साकार ते स्वराज्य ज्यांच्या करी पूर्ण झाले
अश्या वाघराच्या पोटी छावा शंभूराजे जन्मले..

करीत रक्षण स्वराज्याचे शास्त्र सोबत रचिले
बुधभूषण नायिकाभेद अन किती ते दाखले..

युद्धनीती पारंगत लढवय्ये ते धुरंधर
किल्यांसोबत मिळीवला मुलुख समींदर..

पराक्रमी अंगी अन भाषांवरही अधिकार
बालपणीच ग्रंथ लिहिला होऊन शब्दांवर स्वार..

कोणाची टाप ती जो करेल नजरा वर
आदर्श असा राजा तो शुभ्र अवतार..

धन्य ही मायभूमी असे रत्न इथे जाहले
हिंदवी स्वराज्य रक्षिण्या शिवपुत्र शंभू झाले.

हिंदवी स्वराज्य रक्षिण्या शिवपुत्र शंभू झाले...

:- स्व, 
१४ मे, २०२०
पन्हाळगड, कोल्हापूर

Saturday, May 9, 2020

रुळावरचं मरण

रुळावरचं मरण,

कोरोना व्हायरस मुळे जवळ जवळ दीड महिन्यांपासून मजूर राज्यातील विविध ठिकाणी अडकलेत. शुक्रवार दिनांक 7 मे ला रात्री औरंगाबाद येथील काही कामगार रेल्वे पकडण्यासाठी गावाकडे निघाले होते.
मात्र, यातील १६ कामगार पहाटे मालगाडी खाली आल्यानं त्यांचा दुर्दैवी मत्यू झाला...
Source Facebook


रुळावरचं मरण

मोलमजुरीचं जगणं आमचं
काय असणार स्वप्नं आमची?
दिवसागणिक भाकर तुकडा
ही एकच आशा जगण्याची..

ना पाहिलं भविष्य ना चिंता 
त्या उद्या येणाऱ्या दिवसाची.
आजच मरण उद्यावर ढकलत
घेऊन जगलो ढाल कष्टाची.

काम थांबलं रोजगार बुडाला 
पोटाची खळगी भरणार कशी?
गाव झाले बंद रस्ते रेल्वे बंद 
धरली घरची वाट मिळेलतशी.

करत पायपीट धुरळा तुडवीत
पडलो बाहेर  मुठीत घेऊन जीव,
पहाटेच्या अंधारात आला काळ
निसर्गालासुद्धा आली असेल कीव.

रुळावर विखरलो छिन्नविच्छिन्न 
सोबत भाकऱ्या अन घामाचं तूप,
मातीतलीच अहो माणसं आम्ही 
त्या मातीशीच झालो एकरूप.

रक्ताच्या थारोळ्यात पडलो 
शब्द सुद्धा नाही फुटला.
मदत मागायला अन जगायला
एकही अवयव नाही उरला.

मदत मागायला अन जगायला
एकही अवयव नाही उरला...Vj


:- स्व,
०९ मे, २०२०
कोल्हापूर.

Sunday, April 12, 2020

देशाचं हित कुणाच्या हातात?

देशाचं हित कुणाच्या हातात?

मागील काही दिवसांपासून राज्यसह संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. कोविड १९ कोरोना या विषाणूनमुळे राज्य, देशच नव्हे तर संपूर्ण जग बंद पडलं आहे. चीनच्या वुहान मधून सर्वदूर पसरलेल्या या व्हायरस ने मोठ्या शहरांसोबत छोट्या छोट्या खेड्यांत देखील शिरकाव केला आहे. या विषाणूसाठी अजून लस उपलब्ध नसली तरी आपण काही नियम पाळून त्याला रोखू शकतो, पण नियम कुणासाठी??

               वुहान जे की कोरोना व्हायरसचं केंद्रबिंदू होतं, तिथून हा व्हायरस गेला आणि ७६ दिवसांनी तेथील लॉकडाऊन हटवण्यात आलं. तेथील जनतेने पाळलेल्या कडक नियम आणि शिस्त यामुळेच ते यातून पार पडलेत. युरोपियन देश आणि अमेरिका सध्या ज्या स्थितीत आहेत त्या परिस्थिती पासून भारत लांब असला तरी काही लोकं नियम धाब्यावर बसवून गर्दी करताना दिसतच आहेत. 
               केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रशासनाला सोबत घेऊन या विषाणू विरुद्ध लढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. डॉक्टर्स, पोलीस आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे सारेच आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. पण सरकारने सांगितल्याप्रमाणे "सोशल डिस्टन्स" मात्र काही लोकं पाळताना दिसत नाहीत. 
               देश संकटात असताना देशाचे नागरिक या नात्याने आपले पण काही कर्तव्य आहेत ज्याला आपण तयार राहील पाहिजे, पण काही ना काही कारणं काढून लोकं गर्दी करतच आहेत. संचारबंदी असतानाही स्वतःला सुशिक्षित समजणारे देखील सकाळी मॉर्निंग वॉक ला जात आहेत, या मध्ये तरुणांच्या बरोबरीने या विषाणूच्या घातक पातळीवर असणाऱ्या वयोगटातील म्हणजेच वृद्ध व्यक्तिंचाही समावेश पाहायला मिळतो.
               सुट्या मिळाल्या आहेत म्हणून घरी न थांबता काहीजण पार्ट्या करण्यात गुंग आहेत. ग्रुप करून पोहायला जाणे, काट्यावर जमून गप्पा मारणे, गावातून बिनकामाचा फेरफटका मारणे असे प्रकार देखील दिसत आहेत. देशसेवेसाठी कधीही तयार असं म्हणणारे मात्र प्रत्यक्षात उलट वागताना दिसत आहेत. त्यांचं देशप्रेम कमी आहे अशातला भाग नाही पण त्यांना या विषाणूंची भीतीच राहिलेली नाही. 'मला नाही होणार' असं त्यांना वाटतं असलं तरी 'माझ्यामुळे कोणाला व्हायला नको' ही भावना निर्माण होणं गरजेचं आहे. 
               काही ठिकाणी दोन तीन दिवस १००% लॉकडाऊन केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रेप्रमाणे गर्दी होताना दिसत आहे. मुंबई सारख्या रेड झोन मध्ये असणाऱ्या ठिकाणी सुद्धा भाजीपाला, मासे घेण्यासाठी लोकांची गर्दी बघून परिस्थिती अजून किती भयानक होऊ शकते हे समजू शकते. धारावी सारख्या गर्दीच्या ठिकाणी या रोगाचे खूप रुग्ण आढळून येत आहेत. तसेच वरळी मध्ये देखील रुग्णांची संख्या जास्त आहे. पण तरी देखील मुंबई मधील गर्दी "स्पिरिट ऑफ मुंबई" च्या नावाखाली जमतच आहे. हे भयानक आहे. २०१९ ला कोल्हापूर, सांगली ,सातारा जिल्ह्यातील महापुरावेळी परिस्थिती खूप वाईट होती. त्यावेळी लाईट नव्हती, दूध, छोटे दवाखाने,भाजीपाला मार्केट सर्व बंद होतं. मोठ्या शहराचा संपर्क तुटला होता तरीही लोकांनी धीर सोडला नाही. सर्वजण प्रशासनाला साथ देत होते.
               सर्व जबाबदारी प्रशासनावर आणि सरकारवर टाकून नाही चालणार, आपण देखील आपली जबाबदारी उचलायलाच हवी नाही तर आपली परिस्थितीसुद्धा युरोपीयन देशांसारखी व्हायला वेळ लागणार नाही. घरातील एखादी व्यक्ती अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जात असेल तर त्याची योग्य ती खबरदारी त्या व्यक्तींबरोबरच घरच्यांनी देखील घ्यायला हवी. किराणा, भाजीपाला आणि औषध आणण्यासाठी घरातील एकाच व्यक्तीला पाठवाव आणि समान धुवुनच आत घ्यावं. घरातील एखादी व्यक्ती ऐकत नसेल तर त्यांना परिस्थिती नीट समजावून सांगा. 
               शासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि जो कोणी करत नसेल त्यालाही नियमांचे पालन करण्यास सांगावे, काही लोकांच्यामुळे नियम पाळणाऱ्या व्यक्तींनाही याचा त्रास होऊ शकतो. येत्या काही दिवसांत कोरोनाला आपण हारवूच पण त्यासाठी आपला खारीचा वाटा असणं तितकंच महत्वाचं आहे. देशासाठी आणि आपल्या भविष्यासाठी घरीच थांबुया आणि देशसेवा करूया....

: - स्व,
१२ एप्रिल,२०२०
कोल्हापूर

Friday, April 10, 2020

वसुंधरेसाठी.....

वसुंधरेसाठी

निसर्गाची सोडून साथ,
त्यालाच आम्ही दम देतोय.
करेल किती सहन तो ही,
आपले अस्तित्व दाखवून देतोय..
Image Source : Facebook

केली कत्तल बेसुमार या,
आम्हालाच पोसणाऱ्या झाडांची.
हवे नवे बंगले अन सुविधा,
हौस आम्हाला गाड्यांची..

मुजवून टाकू समुद्रसुद्धा
टाकुनी भर खडकांची,
वाटेल भीती त्यालासुद्धा
भल्या मोठ्या या दगडांची..

प्रदूषणावर बोलावे काय
त्याचीही आता हद्द झाली,
फुकट मिळणारी हवा आता
पैसे देऊन मिळू लागली..

माणसाला कधी समजणार 
चूक त्याच्या स्वार्थाची,
समतोल सारा बिघडवू लागलो
बाजू घेऊन व्यर्थाची..

निसर्ग तरी बसेल का शांत
तोच त्याचे उत्तर देईल,
सहनशक्ती च्या उद्रेकावर
सर्वांनाच निसर्गात सामावून घेईल..

चला, आता पुढे येवुया 
घेऊनी शपथ पृथ्वीची,
पापं फेडूनी करू तयारी
वसुंधरेला वाचवायची..

पापं फेडूनी करू तयारी
वसुंधरेला वाचवायची...Vj


:- स्व,
१० एप्रिल, २०२०
कोल्हापूर

Saturday, April 4, 2020

माणसातील माणूस शोधतोय

माणसातील माणूस शोधतोय

धकाधकीच्या जीवनातून या
कुटुंबात मी रमतोय,
आमच्यासाठी राबणाऱ्या त्या
माणसातील माणूस शोधतोय..


विषाणूंचा विळखा जगाला
मनुष्य गुदमरून मरतोय,
कधी नव्हे ते प्राणिमात्रा
स्वतंत्र आयुष्य जगतोय..

आम्ही केली पापं
तेच भोग भोगतोय,
देऊळ बंद झालीत तरी
डॉक्टरांमध्ये देव बघतोय..

दिवसरात्र बंद सारे
तरी निर्धास्त राहतोय,
यंत्रणासारी सज्ज करून
पोलिस रात्रंदिवस जागतोय..

थांबलं असलं जग 
शेतकरी कुठं थांबतोय,
पोटं आपली भरण्यासाठी
तो उपाशीच राबतोय.

किती कौतुक करावे
अश्यांचे देशप्रेम अनुभवतोय,
जीवावर उधार होणाऱ्या त्या
माणसातील माणूस शोधतोय..

जीवावर उधार होणाऱ्या त्या
माणसातील माणूस शोधतोय...Vj

स्व.
०४ एप्रिल, २०२०
कोल्हापूर

Thursday, April 2, 2020

सोबतीचा हात

.

सोबत चालताना तुझ्या 
मन हे फुलुन जाईल,
हात हातातले ते
तिरकी नजर पाहिल..

बोलावे किती अन
जाणून काय घ्यावे,
तुझं ऐकता ऐकता
तुझा होऊन पहावे..

न संपो कधी ही वाट
वाटेवरी चालताना,
गर्दीतल्या स्पर्शापेक्षा
नव्याने स्पर्श झेलताना..

तिमिरात ही पडावा
उजेड हा जीवांचा,
राहो अखंड ऐसें
हात हातात सोबतीचा..

राहो अखंड ऐसें
हात हातात सोबतीचा...Vj

:-स्व
०१ एप्रिल,२०२०
कोल्हापूर

काही तरी बोल ना

 काही तरी बोल ना दिवसेंदिवस तुझा हा दुरावा कधी येऊन संपावशील? प्रेमाचे चार शब्द एकवूनी पुन्हा मला आपलंसं करशील तयारच आहेत कान माझे मन ही आतु...